ऐतिहासिक फड सिंचन पद्धत

गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात फिरताना ३०० वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या आणि आजच्या शेती व्यवसायाला आदर्श ठरेल अशा फड बागायत सिंचन पद्धतीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांशी नदीच्या भौगोलिक रचनेचा उत्कृष्ठ मेळ साधून त्यांचा शेतीला शाश्वत पाणी पुरवठा करण्याची ही पूर्वापार आणि कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी पध्दत असू शकते. आशा प्रकारे महाराष्ट्रातल्या कोरड्या पडलेल्या नद्या प्रवाही करून जर त्यावर फड बागायत पद्धत राबविली तर महाराष्ट्राच्या शेती व्यवसायाला नक्कीच पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होईल. आज आधुनिक जगात जिला आपण कॉर्पोरेट फार्मिंग किंवा सामुदायिक शेती आशा विविध नावानी ओळखतो ह्या शेती पध्दतीची मुळ जनक म्हणजे ‘फड बागायत सिंचन पद्धत’.

ह्या परंपरांगत फड पद्धतीचा जन्म कालावधी बद्दल स्थानिक तज्ञांचा मते वेगवेगळे अंदाज वर्तविले गेले आहेत. मात्र मोगल काळात ‘धाडण्याचा व सामोड्याचा’ असे दोन बंधारे बांधल्यामुळे सन १५३९ मध्ये आबा पाटील ह्यांना पाटीलकी बहाल केल्याची उपलब्ध नोंद ही फड पद्धत सुमारे ३०० ते ४०० वर्षापासून महारष्ट्रात अस्तित्वात असल्याकडे दिशानिर्देश करते. ह्या पद्धतीमध्ये नदीच्या मुखापासून ते शेवटापर्यंत नदीवर विविध ठिकाणी चंद्रकोरीच्या आकाराचे प्रवाहाच्या दिशेने फुगीर आडवे बंधारे बांधण्यात येतात. ह्या चंद्र्कोरीला जोडून नदीच्या दोन्ही तीरांवर पाट काढले जातात. चंद्रकोरीच्या आकाराच्या बंधाऱ्यामुळे पाण्याला अटकाव न होता दबाव प्राप्त होवून ते वेगाने दोन्ही पाटाकडे वाहते होते. गुरुत्वाकर्षण आणि भौगोलिक रचनेमुळे वेगाने हे पाणी पटामधून ठरवलेल्या फड बागायतीमध्ये जावून पोहचते. जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा बंधाऱ्याच्या थोड्या अंतरावरच पाटाला पाडलेला दरवाजा उघडला जातो त्यामुळे पाणी आपोआपच परत नदीत येते आणि पाट वाहायचा बंद होतो. कोणतीही विद्युत यंत्रणा न वापरता यशस्वी पाणी नियोजनाची ही योजना म्हणजे एकमेवाद्वितीय. बर ह्यात फक्त पाण्याचे नियोजन नसते तर ह्या पद्धतीवर अवलंबून असणाऱ्या एकूणच पिकं पद्धतीचे व्यवस्थापन ह्यात यशस्वीपणे करता येते.

नदी ते पाट यामधील सिंचनयोग्य आशा जमिनीस ‘थळ’ असे म्हणतात. थळ चार भागात विभागलेला असतो. ह्या प्रत्येक भागास फड म्हणतात. ह्यातील एका फडात उसाचे तर उरलेल्या तीन फडात भुसार पिके घेतात. जमिनीचा कसं कायम राहावा म्हणून पाळी पद्धतीने पिके घेतली जातात. ह्या पद्धतीचे वैशिष्ट्य असे कि, फडातील सर्व भागात पिकाची लागण तसेच पिकाची कापणी एकाच वेळेस करण्यात येते. त्यामुळे पाणी शिस्तबध्द पद्धतीने सर्व क्षेत्रास दिले जाते.

ह्या पद्धतीतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सामुदायिक जबाबदारी, ज्याची महाराष्ट्रातील एकूणच शेती व्यवस्थेला आज गरज आहे. ह्या बंधाऱ्याचा फायदा ज्या ज्या गावास मिळतो त्या त्या गावातील अनुभवी ग्रामस्थांची मिळून एक ‘पाणी पंच समिती’ असते. ही समिती बंधाऱ्यावरील सर्व बागाईतदाराना वर्षातून विविध वेळी दवंडी देवून एकत्र बोलविते. बंधाऱ्यावरील फडाची मशागत केव्हा करायची, पिके कोणत्या दिवशी लावायची, कापणी, कोळपणी केव्हा करायची हे सर्व पाणी समितीचा प्रमुख इतर पंचांशी सल्लामसलत करून ठरवतो व त्याप्रमाणे दवंडी देवून कामे केली जातात. आहे कि नाही ही आजच्या कॉर्पोरेट शेतीला धडे देणारी सामुदायिक जबाबदारीचे भान राखणारी तरीही आर्थिक गणिते आणि पाणी नियोजनाची शिस्त सांभाळणारी सामुदायिक फड बागायती पद्धती. ह्या पद्दतीच आजच्या काळातील योग्य उदाहरण म्हणून धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीकडे पाहता येईल. ह्या नदीवर एकूण ३० बंदरे ह्या पद्धतीने बांधले गेले आहेत. ज्यामुळे ३६२३ हेक्टर क्षेत्र बागायती झाले होते ते सुद्धा ३०० ते ४०० वर्षापूर्वी.

हल्ली मात्र आपल्याच घोड चुकांमुळे ही अत्युतम बग्यात पद्धत सुद्धा दुरावस्थेत पोहचली आहे. शाश्वत पाणी पुरवठा हा या योजनेचा आत्मा आहे. मात्र जंगल तोडीमुळे व भूगर्भातील पाणी साथ उप्स्याचा वेग व प्रमाण प्रंचड वाढल्यामुळे व भू-गर्भातील पाणी साठ्याचे पुनर्भरण त्या प्रमाणात न झाल्यामुळे भू-गर्भातील पाणी नदी-नाल्यात येत नाही. नदीत साधारणतः ५ ते ६ महिनेच प्रवाह असतो. वेगवेगळ्या कारणांमुळे पाणी उपलब्धताच कमी झाल्यामुळे बंधार्यावरील फड पद्धतीचा ऱ्हास होत चालला आहे.

मित्रानो मागच्या लेखात आपण एका गावाने घडवलेली व जपलेली पाणी क्रांती पहिली अज्ज्च्या लेख सुद्धा त्याच पाणी क्रांतीची गरज पुन्हा अधोरेखित करतोय …विचार करा आपण पुढच्या पिढीला नक्की काय देवून जाणार आहोत त्याचा.

योगेश मनमोहन परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s