कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

कचरा या एका शब्दाभोवती भारतीय अर्थकारण खेळतंय का असं बऱ्याचदा वाटतं. सकाळी उठल्यावर घराबाहेर पडल्यापासून ते घरी आल्यावर देखील नजरेस पडणारा हमखास प्रकार .. कचरा .. घरापासून तयार झालेला कचरा कसा मोठा मोठा होत राक्षस होत जातो आणि किती लोकांच्या आरोग्याशी खेळतो हे डम्पिंग ग्राउंड चा चक्कर मारल्याशिवाय नाही कळत. आपण तयार केलेला कचरा साफ करण्यासाठी किती तरी सफाई कामगार, कचरा वेचणारी, ती वर्गीकृत करणारी लोकं त्यांचे आरोग्य पणाला लावत असतात. ही सर्व लोकं लवकर आजारी पडतात आणि मरतातही लवकर आपण स्वच्छ सोसायटीत राहावे म्हणून. आपण अप्रत्यक्ष पणे या लोकांच्या जीवावर चालून जातो रोज अगदी रोज.  सुरवात आपल्याच घरापासून होते. संपुर्ण दिवसात आपल्याकडून कसा-कसा कचरा निर्माण होतो ? जेवण बनवतांना घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावरूनच गल्ली ते दिल्ली पर्यंत ते अगदी संपूर्ण पुर्थ्वीवर जिथे जिथे मनुष्य वस्ती आहे तिथे किती कचरा तयार होतो याचा अंदाज घेता येईल.

भाजी कापतांना वेगळी केलेली मुळे, कांद्या- लसणीची सालपटे , फळांच्या साली, दुधाची पिशवी, वाण्याकडून सामानाबरोबर आलेल्या प्लास्टीकच्या पातळ पिशव्या, नव्या कपड्यांचे पुठ्ठ्यांचे खोके.. एक ना एक अनेक गोष्टी छोट्या छोट्या स्वरूपात कचऱ्यात मोडत जातात. ह्या कचऱ्याचा विचार करत असताना आपण घराबाहेर पडतो तोवर  काय दिसतं? तर रस्त्यावर बसलेल्ल्या कोळीणीच्या टोपल्यात मासे, कत्तल खाण्यातले मारून झालेल्या जनावरांचे मास जैविक कचर्याकडे बोट दाखवायला लागतात. नाकावरचा रुमाल खाली आणतो न आणतो तोच रस्त्यावर राडारोडा घेऊन जाणारा त्यातही कुठेलीही आच्छादन नसलेला ट्रक आपल्याला उघड्या नाल्यावर रिकामा होतांना दिसतो. कोपऱ्यावरच्या भंगार वाल्याच्या दुकानात तुटलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या, आजोबांची मोडलेली काठी, गंजलेली पत्र्याची पेटी, बिघडलेला जुना संगणक ह्या भावनिकक वस्तूं पाहून आत्तापर्यंत घनकचरा म्हणून एकलेल्या कचर्याची नुसती प्रारंभिक उजळणी सुध्दा दमछाक करायला लावते. आणि अश्यातच रस्त्यावर ओसंडून वाहणारा कचऱ्याचा  डब्बा पाहून परदेशी नागरिक मागच्या बाजूने रुमाल नाकावर ठेऊन  रास्ता ओलांडताना दिसतात आणि त्याच क्षणी स्वतःची भारताच्या प्रतिमेचा आपण कचरा केला याची  लाज वाटायला लागते.

किती भयंकर प्रमाणात कचरा आणि गलिच्छपणा आपण निर्माण करतो कि बाहेरुन येणारे लोक आपल्या ह्या पवित्र भूमीवर मोकळा श्वास सुध्दा घेऊ शकत नाहीत? फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर दररोज आपण अदमासे २० ते २२ हजार मे. टन घनकचरा निर्माण करतो. नवीन नवीन शहरांचा विकास होत असल्याने जवळ जवळ १० हजार मे.टन डेब्रिजची निर्मिती आपल्याकडे होतेय. तर शहर वगळता ग्रामीण भागातून जवळपास ६ ते ७ कोटी टन टाकाऊ शेतीमाल दरवर्षी महाराष्ट्रात तयार होतोय. ह्या सर्व कचर्याची विल्हेवाट लावायची असेल तर, येणारा खर्च नक्की काय सांगतोय हे पाहिलं तर आपल्याला वाईट सवयींचा लगेच अंदाज येईल. महाराष्ट्रात विविध ठीकाणांवरुन कचरा गोळा करण्यासाठी कमी-आधिक ६५० रु प्रती टन एवढा खर्च येतो. जमा केलेल्या कचर्याची वाहतूक करुन त्याला प्रक्रीया केंद्रावर आणेपर्यंत अंदाजे २५० रु.प्रती टन खर्च येतो. (हा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.) मात्र कचरा प्रक्रियाकेंद्रात आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च आहे फक्त ३०-३५ रु प्रती टन. इंग्रजीत एक म्हण आहे. “Prevention is better than cure ” तिचा साधा सोपा मतितार्थ आहे कि संकटावर उपाय शोधण्याआधी ती निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी व त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. वरची आकडेवारी देखील ह्याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करतेय.

कचरा गोळा करण्यावर व त्याच्या वाहतुकीवर जर एवढा प्रचंड खर्च येत असेल तर प्रत्येकाने होईल तितकी त्याची निर्मिती न होण्यावर भर दिला तर अनिवार्य कचर्याची विल्हेवाट अगदी कमी खर्चात होऊ शकते. अगदी साधी पध्दत आहे हो. घरी निर्माण होणार्या ओल्या व सुक्या कचर्याला जर आपणच बाजूला काढून वेगवेगळ्या पिशवीत ठेवला तर शासनाचा किती पैसा वाचेल ह्याचा विचार करा.(आता शासनाने आधीच नियम काढला आहे, लोक तसेच करतात असे ज्यांना वाटत असेल त्यांनी कचरा गोळा करणाऱ्या सोबत केवळ १ दिवस फिरावे , म्हणजे वास्तव कळेल) कचऱ्यापासुनदेखील अर्थकारण करता येते ह्याची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. प्रत्येकाने नुसत्या आपल्या सोसायटीत एखादा गांडूळ प्रकल्प टाकला तरी शासनावर पडणारा कचऱ्याचा भार किती हलका होईल ! शासनानेही कचऱ्याला भार न मानता अर्थाजनाचे साधन मानले तर त्यातून खूप काही निर्माण करता येईल. आज कचऱ्यापासून काय बनत नाही.. खते बनतात, गॅस बनतो, वीजनिर्मिती होते. प्लास्टील पासून रस्ते बनतात, डेब्रिज पासून विटा बनवण्याचा कारखाना टाकला तर बांधकाम व्यावसायीक चोरुन नाल्यात किंवा रस्त्यावर डेब्रिज टाकणार नाहीत. शासनाला डेब्रिज घेतल्याने व विटांच्या विक्रीचे असे दुहेरी उत्पन्न त्यातून मिळणार नाही का ? ६ कोटी टन शेती त्याज्य माल जो आपले शेतकरी बहूतांशी जाळून टाकण्यासाठी किंवा शेताच्या भाजणीसाठी वापरून प्रदूषणात भर घालतात त्याचं शेती त्याज्य मालापासून आज इंधन विटा तयार होतात आणि औद्योगिक कारखान्यात त्या ५ ते ६ हजार रुपये प्रती टन भावाने विकल्या जातात. हे तंत्रज्ञान आणि या सारखे इतर शेतीपूरक उद्योग जर शेतकर्यांना शिकवले तर कितीती शेतकर्यांची आत्महत्या थांबवल्याचे समाधान शासनाला लाभणार नाही का?

ymp-gk1

ज्या प्लास्टीकला आपण भस्मासुर बोलतो त्याचा भारतातला दरडोई वापर फक्त ६ किलो आहे आणि प्रगत देशात तो २७ किलो आहे. एकूण घन कचर्यापैकी फक्त ४ टक्के कचरा हा प्लास्टीकचा आहे आणि प्रगत देशाात तो २७ किलो आहे. एकूण घन कचऱ्यापैकी फक्त ४ टक्के प्लास्टीक कचऱ्यावर प्रक्रीया होते. उरलेल्या ४० टक्के प्लास्टीकवर सुध्दा ती करता येऊ शकते पण त्यासाठी प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीकची वेष्टन हि कुठेही रस्त्यावर, नाल्यामध्ये फेकायच्या आपल्या सवयीला पहिला आळा घालावा लागेल. नुकताच सिंगापूर वरुन पयर्टन करुन आलेल्या माझ्या मित्राने, सिंगापूरच्या रस्त्यावरची स्वच्छता सांगतांना जेव्हा खालेल्या गुटख्याचे आवरण रस्त्यावर तसेच टाकले तेव्हा ह्या सवयीची भीषणता मला प्रकर्षाने जाणवली.. जो पर्यंत आम्ही स्वतःच्या डोक्यातून अस्वच्छतेचा कचरा काढून फेकत नाही तो पर्यंत आम्हीच तयार करत असणारा कचरा जमीन, पाणी, पर्यावरण प्रदूषित करत राहणार येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य उध्वस्त करत राहणार. स्वच्छ भारत मिशन हे ओठांवर नाही तर डोक्यात भिनले तेव्हाच हा देश स्वयंशिस्तीने कचरा आणि अस्वच्छतेचे समूळ उच्चाटन करेल.

योगेश मनमोहन पारुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

ymp-gk5

One thought on “कोटींचा कचरा कि कचऱ्यावर कोटी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s