रासतो की कहानी.. क्यो होती है हानी

सर्वप्रथम धन्यवाद ! ज्या कारणासाठी हे लिहितो आहे ते हळू हळू का होईना पण परिणामकारक ठरते आहे. लोक विचारता आहेत, चर्चा करता आहेत त्याच अनुषंगाने रस्ते तयार करण्याची शास्त्रीय पद्धत आणि वापरली जाणारी पद्धत यात काय तफावत असते हे देखील अनेकांनी विचारले त्यामुळे मागच्या लेखात आपण जुन्या रत्यावर पडणारे खड्डे कसे भरतात (चुकीच्या पद्धतीने ) हे पाहीले आता आपण संपूर्ण रस्ताच सरकारी यंत्रणा  कशा  पद्धतीने दुरुस्त करते आणि त्याचे त्या रस्त्यावर पुढे  काय परिणाम होतात याचा थोडा अभ्यास करणार आहोत हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच सर्व सामान्य नागरिकांनी जाता येता रस्त्यात जर दुरुस्तीचे काम सुरु असेल तर थोडा वेळ का होईना उभे राहून ते पाहावे हा लेख वाचल्यानंतर आपण नागरिकांनी  रस्त्यावर उभे राहून कंत्राट दाराला चुकीच्या पद्धतीने रस्त्याच काम करतोय याचा जाब विचारला तर हे लिहिणे काही अंशी सार्थक होईल. ह्याच उद्दिष्टाने हे लिहिणे आहे. सर्व सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त चौकस व्हावे आणि भ्रष्ट यंत्रणांना जाब विचारायची सुरवात करावी , त्यांची जरब या यंत्रणांवर असावी हीच आमची या लिखाणामागची प्रेरणा आहे कदाचित हा लेख जरा जास्तच तांत्रिक  वाटला तरी वाचकांनी कृपया रस्ता दुरुस्तीच्या या उत्तम पद्धती या ज्या जगभर वापरतात त्यांचा थोडा तरी अभ्यास करावा हि अपेक्षा.

जुन्या रस्त्याची (संपूर्ण रस्त्याच्या वरचा डांबरी थर) दुरुस्ती करताना २ टप्यात केली जाते १)प्रथम रस्त्यावरचे खड्डे बुजवणे  २)सपाट झालेल्या रस्त्यावर डांबर व खडीचा नवीन थर चढविणे. सर्व प्रथम जुन्या रस्त्यावरचे (संपूर्ण रस्त्याच्या वरचा डांबरी थरासकट ) खड्डे हे साध्या खराट्याने झाडून घेतले जातात. त्या खड्यातून अडकलेले खडीचे तुकडे बाहेर निघावेत  हा त्या मागचा उदेश असतो. त्या नंतर त्या संपूर्ण रस्त्यावर ‘सरफेस मिलिंग’ कराव लागतं. ह्या प्रक्रीये मध्ये कटरने रेतीचा वरचा थर उडविणे ह्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. त्यानंतर पुन्हा संपूर्ण रस्ता स्वच्छ झाडला जातो. रस्ता झाडल्या नंतर संपूर्ण रस्त्याचे विजुअल इन्स्पेक्शन (प्रत्यक्ष अवलोकन )केले जाते. ह्या अवलोकना दरम्यान कंत्राटदाराला रस्त्यावर पूर्वी टाकलेल्या खडीमध्ये (खडीच्या दोन तुकड्यामध्ये) किती अंतर आहे ह्याचा अंदाज येतो. ह्या अंदाजावरच तो कंत्राटदार डांबर सोल्यूशन आणि खडी (शक्यतो २ किंवा ३ नंबरची )याचं एकजीव मिश्रण तयार करतो हे मिश्रण नंतर झाडून स्वच केलेल्या रस्त्यावरील खड्यात टाकून उच्च दाबा खाली दाबले जाते. यात हि रस्त्याच रोलिंग दोन प्रकारे करता येते (आपल्याला सर्व प्रथम रस्ता सपाट करणे आवश्यक असल्याने त्या वरील  छोटे मोठे खड्डे  आधी भरावे लागतात ) कारण त्या शिवाय  आपण त्यावर नवीन डांबराचा  थर देऊ शकत  नाही. पहिल्या प्रकारात खड्यावर  जड रोलर फिरवला जातो. पण हा प्रकार आर्थिक दृष्ट्या भुर्दंड देणारा ठरत असल्याने दुसरा प्रकार म्हणजे थमम्पिंग पॅड जास्त सोयीस्कर ठरतो. या प्रकारात खड्यावर मिनिटाला १२० ते १५० वेळ या वेगाने लोखंडी पॅड ने हॅमरिंग केले जाते. खड्यावर अशा प्रकारे  हॅमरिंग केल्याने प्रचंड कंपने आणि उच्च दाब यांमुळे खडीचे  छोटे दगड एक मेकांना घट्ट बिलगले जाऊन आत हवा किंवा  पाणी जाण्यास  जागा उरत नाही रोलिंग नंतर ह्या मिश्रणाचे संपूर्ण रस्त्यावर स्प्रेगनच्या सहाय्याने डांबरी मिश्रणाचा (तापमान २५ अंश सेल्सियस ते 40  अंश सेल्सियस असावे लागते) मारा केला जातो (आपल्याकडे स्प्रेगनच्या जागी १५ लिटर पत्र्याचा डब्बा घेऊन त्याला होल पडून तो वापरतात ……….कप्पाळ

ymp raste kahani11.jpg
इथपर्यंतच्या प्रक्रीयेनंतर रस्त्यावर समपातळीने हॉट मिक्स ओतलं जाते. (हॉट मिक्स म्हणजे खाडी आणि डांबराचे गरम मिश्रण) हे हॉट मिक्स तयार करताना डांबराचे तापमान ९२ अंश सेल्सियस ते ११२ अंश सेल्सियस या दरम्यान राहते. जेव्हा हे मिश्रण रस्त्यावर ओतले जाते तेव्हा त्याचे तापमान ९२ अंश सेल्सियस असावे हे अपेक्षित असते. (आपण आंघोळीला वापरतो ते गरम पाणी साधारण २५ ते ३० अंश सेल्सिअस एवढे असते कारण शरीर तेवढेच सहन करू शकते. यावरून ९२ अंश सेल्सियस म्हणजे किती याची कल्पना करता येईल ) ओतलेल्या ह्या मिश्रणाचा पहिला रोड रोलर हा हलक्या वजनाचा आणि त्याच्या मागोमाग साधारणता १० ते १५ फुटाचे अंतर सोडून कंप  पावणारा आणि जड वजनाचे रोलर फिरवावे हे  साधारण जगत मान्य पद्धत आहे. साधारणतः रोड रोलर १:३० ते २ तास सलग फिरवणे अत्यंत निकडीचे असते.

 पण आपल्या कडे खरच अश्या पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती होते का?  चला पाहूया आपल्या कडे नेमके होते काय ते.. आपल्या कडे कमीत कमी वेळात काम करण्याची घाई असल्याने डांबर व खडीचे मिश्रण झट-पट  तयार करण्यासाठी त्यात जळके तेल किंवा काळे झालेले  इंजिन ओईल टाकतात (जे नंतर रस्त्यावरून जड गाड्या जायला लागल्या की,रस्त्यावर येत आणि खालच्या खडीमध्ये पोकळी तयार होते  ज्यात पाणी साचून डांबराचा चिवटपणा संपतो) हॉट मिक्स तयार करताना आणि पसरताना तापमानाची पातळी  संभाली जात नाही. (आम्ही मुंबई पासून पेन पर्यंत ६ रस्त्यांचे हॉट मिक्स तपासले होते तेव्हा सर्वात  जास्त तापमान वडखळ ते पेन दरम्यानच्या रस्त्यात वापरलेले हॉट मिक्स ६८ अंश सेल्सियस तापमानाचे होते. सर्व सामान्य पातळी ९२ अंश सेल्सियस असावी हे आपण मगाशी पाहीले मात्र एवढे तापमान असून देखील आपल्याकडे रस्ते बनवणारे कामगार रबरी किंवा प्लॅस्टिकची चप्पल घालून त्यावर चालू शकतात.. आहे की नाही गम्मत! बेसिक गोष्टी सुद्धा जिथे पाळल्या जात नाही तिथे रस्ते तरी कसे टिकणार ?) त्या नंतर रस्त्यावर अवघ्या १० ते १५  मिनिटच  रोलिंग  केले जाते. (जिथे ३ रोलर ठराविक अंतराने मागो माग फिरवणे गरजेचे असते तिथे केवळ एकाच रोलर वापरला जातो.) त्यामुळे जड वाहन गेल्यावर रस्त्याला  चाकोरयां (कॅरेज मार्क्स )पडतात ह्या चाकोरयात सुष्म प्रमाणात पाणी साठून ते आतल्या खडीत झिरपते त्याने डांबराचा चिकटपणा  जाऊन उलटी प्रक्रिया म्हणजेच खडीचे विलगीकरण सुरु होते. हि प्रक्रिया थोड्याशा दाबाने वाढत  जाऊन शेवटी काही तासातच आतलं पाणी गाड्यांच्या चाकाच्या घर्षणाने उष्णता निर्माण होऊन तापून  प्रसरण पावते आणि वरच्या डांबरी रस्त्यालाच फाडून खड्डा तयार होतो. अवघ्या काही तासातच रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ताअशी अवस्था करणारी हि प्रक्रिया सर्रास  वापरली  जाते……. ते सुद्धां  पैसे घेऊन..

मित्रानो लक्षात ठेवा आजही जगातले ९६% रस्ते हे डांबरीच आहेत मात्र बाहेर त्यांना खड्डे पडत नाहीत कारण ते बनवताना वर सांगितलेली प्रक्रिया अगदी काटेकोर पणे राबवली जाते. जगभर डांबरी रस्त्यांना gentelmen  roads बोलतात कारण या रस्त्यावर पडल्यावर मार कमी लागतो ब्रेक उत्तम लागतात. गाडीच्या चाकांची झीज कमी होते. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणता रस्ता हवा ते …. 

योगेश मनमोहन पारुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

One thought on “रासतो की कहानी.. क्यो होती है हानी

  1. If our cotractors follow the process religiously then they will go bankrupt. They cant afford as lot of commision they pay to get the contract and whatever balnce they try and make the roads. Biggest corruption in road contracts.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s