पाणी बाणी …मुंबईची

पाणी, जलत्व, जलतत्व जीवसृष्टीचा आधार, ७५ टक्के पृथ्वी पाण्याने व्यापली आहे हे लहानपणापासून आपण वाचत आलेलो आहोत. आपल्या दैनंदिन गरजा पाण्यापासून सुरू होतात व पाण्यावरच येवून थांबतात. मनुष्याचे अवघे जीवन या मुळस्त्रोताने व्यापून उरते. याच पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीतलावर समुद्राने कवेत घेतलेल्या ७ बेटांचे बांधकाम शास्त्रांच्या उच्चतम कसोटीवर घडविण्यात आलेले सुनियोजित शहर मुंबई! (आत्ता त्याच शहराचे सर्व आघाड्यांवर १२ वाजलेत हे वेगळं) मुंबईला मायानगरी म्हणून ओळखतात. स्वप्नांचे ओझे पापण्यांवर पेलत देशाच्या कांनाकोपर्‍यातून लोक मुंबईत येतात व याच मायेत गुरफटून पडतात. रस्त्यावरील सावल्यांच्या गर्दीत अनेक अनोळखी, अनाहूत सावल्या मिसळतात व हरवतात. परिणाम स्वरूप या गर्दीत मुंबईचं स्वतःचच अस्तित्व हरवायला लागलयं. ह्या अविश्रांत महानगरकडे पाहिल्यावर वाटायला लागलं आहे की. मुंबईत फक्त इनकमिंग तेवढं दिसतय आऊट्गोइंग ह्या प्रकाराचा या शहराला विसर पडलेला दिसतोय. मात्र या फ्री इनकमिंगचा चार्ज नकाळत मुंबईकरांना भरावा लागतोय. या २० वर्षात इथल्या पायाभूत सुविधांवर प्रमाणाबाहेर ताण पडलाय. इथल्या रोजच्या जगण्याच्या वारीवर लोढ्यांचा त्सुनामी आदळतो आहे. व पायाभूत सुविधांचा उध्वस्त ढिगारा तेवढा मागे उरतो आहे.

मुबलक जलदृश्यांनी वेढलेल्या मुंबईकरांसाठी पाणीप्रश्न हा अवघड जागेवरचे दुखणे होवून बसलाय. जे सत्ताधारी व प्रशासनाला दाखवूनही त्यांनी हाताची झापड डोळ्यावर चढवली आहेत. इथल्या सर्वसामान्यांचा हक्काचं असणारं पाणी ही त्यांना जगण्यासाठी महाग का व्हावे? याचा सार्वजनिक दृष्टीकोणातून विचार केला तर पुढील बाबी दिसून येतात.. मुंबई महानगपालिकेत ए ते टी या २४ प्रभागात एकूण २२७ विभाग आहेत. या सर्व विभागात कमीत कमी २ ते ४ सार्वजनिक प्रसाधनगृहे असतील असे गृहीत धरले तरी संपूर्ण मुंबईत ५०० ते १००० सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांस प्रत्येक ग्राहकास किमान १० लिटर पाणी लागते असे गृहीत पकडले तरी दिवसभरात साधारणतः १००० ग्राहक नित्यानेमाने या शौचालयांचा वापर करीत असतात. त्यानुसार पाहिले तर १०० लाख लिटर पाणी केवळ शौचकूपसाठी वापरले जाते. त्यास भरीस भर म्हणून कपडे धुणे, आंघोळ करणे, टॅक्सी धुणे याला किमान ५० लिटर लाख लिटर पाणी धरले तर अख्या मुंबईत जवळजवळ १५० लाख लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे पाणी हे जिवंस्त्रोत असताना संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. एकीकडे हे चित्र असताना शहरी भागात पिण्याचे पाणी ज्यावर स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांचा पैसा खर्च करून या पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी पिण्यालायक करीत आहेत, तेच कोट्यवधी रुपये खर्च करून शुद्ध केलेलं पाणी गरज नसताना मुंबईत केवळ अनावश्यकरित्या प्रसाधन, कपडे धुणे, लादी पुसणे, आंघोळ करणे, टॅक्सी धुणे या कामाकरिता वापरले जात असेल तर याला नेमके काय म्हणायचे?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गृहनिर्माण संस्थांना जी बोरवेल मारण्याची परवानगी दिली आहे. तीच मुळात गृहनिर्माण संस्थामधील पिण्याचे पाणी वगळून इतर गरजा पूर्ण केल्या जाव्यात म्हणून दिली आहे. ज्यात भांडी धुणे, लादी पुसणे, टोयलेट फ्ल्शिंग आदी बाबी समाविष्ट आहे. परंतु ह्या मूळ हेतुलाच ह्या गृहनिर्माण संस्था छेद देताना प्रकर्षाने दिसून आले आहे. ह्या बोरवेल चे पाणी ह्या संस्थांमार्फत अवैधरीत्या टँकर साखळीला विकले आहे. ह्या अवैध पाणी विक्री मुळे मुख्यतहा दोन महत्वाच्या समस्या मुंबईकरांच्या वाट्याला येत आहेत. एक म्हणजे वारंवार मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करून मुंबईची भूजल पातळी खालावत चालली आहे. व दुसरी म्हणजे जास्त दाबाची क्षमता असलेल्या पंपांकरवी पाणी उपसा केल्याने लगतच्या समुद्रातील क्षारयुक्त घटक मुंबईच्या जमिनीत पसरत चालले आहेत. या अवैध पाणी विक्रीमुळे टँकर साखळीची मांदियाळी तर होत आहेच. ( तो एक विस्तृत विषय आहे. त्यावर पुढील काही भागात बोलणार आहोतच.) मात्र अपेय करणांसाठीही बोरवेलचे पाणी न वापरता प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याने बृहन्मुंबईच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. हीच बाब मुंबईतल्या सार्वजनिक शौचलयासबंधीही या शौचालयांना सामान्य मुंबईकरांच्या खिशाला पाणी कराची कात्री लावून प्रक्रिया केलेलं पिण्यायोग्य पाणी पुरवण्यात येतं, ज्याचा हिशोब ठेवण्यासाठी साधे पाण्याचे मीटर लावण्याची तसदिही मनपाला घ्यावीशी वाटली नाही. हे त्यांच आर्थिक औदार्य असेलही कदाचित मात्र त्यासाठी मुंबईकरांचा खिसा का कापावा? मीटर नसल्याने या सार्वजनिक शौचालयांना लागणारा भरमसाठ पाण्याचा लेखाजोखा ठेवता येत नाही. त्यामुळे शौचलयातून पाणी विक्रीच्या घटना सर्रास घडतांना दिसतात आणि सोयिस्कर रित्या त्याकडे डोळेझाक केलीही जाते. त्यामुळेच मुंबईत प्रत्यक्षात दाखवण्यात येणारा (आहेच असे नाही) पाण्याचा तुटवडा भरून काढायचा असेल तर गृहनिर्माण संस्थांप्रमाणे सार्वजनिक शौचालयांनाही बोर मारून पाण्याची दैनंदिन गरज भागवण्याची सक्ती महापलिकेने केली पाहिजे आणि अर्थातच पाण्याचे मीटर लावण्यासकट, नाहीतर बोअरवेलच्या पाणी विकून शौचालय मालकांचे उखळ पांढरे व्हायचे आणि त्यात पुन्हा मुंबईकर …

सार्वजनिक शौचालयांच्या एकंदरीत कार्यपद्धतीकडे सखोल पाहील्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुळात यांना शौचालय चालवण्याची परवानगी दिलेली असताना बहुतांशी शौचालयात अंघोळीची व्यवस्था का करण्यात आली आहे? या मागील हेतु हा मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे हा तर नाही ना? अश्या रितीने मुंबईकरांच्या वाटेचे हक्काचे पाणी उधळले जाते आणि मुंबईकरांच्या निशिबी येते पाणी कपात आणि पाणी दरवाढ! एकंदरीत हीच परिस्थिति ह्याच पद्धतीने बेफिकीर व बेदकार पद्धतीने सुरू राहिली तर कदाचित मुंबईत पाण्यासाठी खून पाडले जातील. आजच ह्या बाबींवर ऊहापोह करून समाधान काढले नाही तर ओसाड रस्त्यांवरील रक्तरंजित भविष्य तेवढे शिल्लक उरेल. कुणीतरी बोलून ठेवलय की, तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होईल, मुंबई सह महाराष्ट्रात उद्भवलेला (कृत्रिम) पाणीप्रश्न त्या नांदीकडे पडणारे पाऊल तर नाही ना ?

क्रमश:

ymp pani bani 2

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s