उपोद्घात

नमस्कार,

आपल्या सर्वांना कंदिलाची गोष्ट माहीत असलेच. एका गावकर्‍याला अंधार्‍या रात्री डोंगर चढायचा होता मात्र मार्गस्थ होतांना अंधार प्रचंड होता. आजूबाजूला किर्र करणार्‍या रानात आवाजाच्या सोबतीला फक्त अंधार होता. आणि अश्यात प्रवाशाच्या हाती होता फक्त कंदील. प्रवास करावा की नाही ह्या विचारतंद्रित असताना त्याने एक पाऊल पुढे टाकले, एक पाऊल प्रकाश पुढे सरकला एका पावलाच्या प्रकाशावर त्या प्रवाश्याने अक्खा डोंगर पार केला.

मी योगेश परुळेकर अंतर्गत सजावट रचनाकार (इंटिरियर डिजायनर ),  दिड तपापासून म्हणजेच साधारण १८ वर्षापासून या क्षेत्रात काम करत असताना घर, कार्यालय किंवा संबंधित भाग ऊंची दर्जा ठेवून आधिकाधिक कसा सुरेखित करता येईल हाच केंद्रबिंदू ठेवून काम करत आलोय. काम दिसताना चांगले दिसत असेल पण ते माझ्या मापदंडात बसत नसेल तर ते काम माझ्या लोकांकडून पुन्हा करून घेतो. कारण दिसणे तेव्हाच सुंदर होईल जेव्हा त्याची मूलभूत रचना शिस्तबद्ध असेल.  व्यावसायिक दृष्ट्या हे काम करत असताना माझा परीपेक्ष हटवून तो मी महानगरांच्या,  बाबतीत लावून पाहिला. काय दिसलं ? अस्ताव्यस्त नगररचना (नगर वसवताना असलेली मूळ रचना उत्तम असते तिचे महानगर होताना ती बिघडवली जाते.) पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधांची केलेली गळचेपी आणि त्यामुळे झालेली अत्यावस्थ महानगरे.

बरं या बाबतीत रचनेच्या दृष्टीने किंवा पायाभूत सुविधांची वाणवा व त्यामुळे महानगरे, शहरं गांजलेल्या अवस्थेत असताना केवळ बघत राहणे हा पर्याय असू शकतो का ? माझ्यासाठी तरी नाही…  गेल्या १० वर्षापासून महानगरांच्या आहेत त्या पायाभूत सुविधा कश्या सुधरवता येतील आणि नवनवीन उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा रुजवून घेता येईल यासाठी मी व माझा गट सतत कार्यरत आहोत. त्याचे काही सकारात्मक परिणाम ही आम्हाला पाहायला मिळाले आहेत तर काही अजून यायचे आहेत. माझ्या ह्या ब्लॉग मध्ये पुढे लिहिणार्‍या विषयांमध्ये त्यांचा उल्लेख येईलच.

शहरे दुरुस्त व तंदुरुस्त करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करायचे आजवर केलेलं काम आपल्या समोर मी या माध्यमातून मांडणार आहे. काही उपाय ही सांगणार आहे. आपल्याकडून ही सूचनांचे स्वागत असेलच. आपल्या कल्पनाही माझ्याकडून इथे मांडल्या जातील.  एखाद्या समस्येवर निदान हवे असेल त्या संबंधात माहिती हवी असेल तर आपण तसेही सांगावे त्या दृष्टीनेही इथे लिहिता होईल.

कुठलेही महत्तम कार्य करण्याकरता समूह लागतो तो एकाच विचाराचा नसेलही, एकाच स्तरातलाही नसेल मात्र त्याचा उद्देश एक असेल तर कार्य अजून उच्च दर्जाचे होते. आकर्षक रचना असलेली शहरं, उत्तमोत्तम दर्जा असलेल्या पायाभूत सुविधा, दर्जेदार वाहतूक सुविधा असलेले तरीही एक सुटसुटीत शहर महानगर मला माझ्या हयातीतच बघायचे आहे. या उद्देशानेच मी १० वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू केला आहे. सर्वार्थाने उत्तम दर्जाचे शहर इच्छिणार्‍या सार्‍यांचे यात स्वागत आहे.

मी कंदील घेवून निघलोय, अडचणींचा डोंगर सर तर होणारच तुम्ही देखील कंदीलासोबत आलात तर प्रवास सोपा होईल तो ही लक्ख उजेडात. वाट बघतोय मी तर कधीच निघालोय!

ता क :  कंदिलाच्या आधी गावकर्‍याच्या अंतरी इच्छाशक्ती प्रकाशित झाली होती कंदिलाच्या प्रकाशाने त्याला फक्त सोबत दिली.

योगेश परूळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

10607968f539c0faa50deef343df55d7-d3fua6z

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s